न्यायालयात खोटे कागदपत्राद्वारे भावाची फसवणूक : न्हावीतील महिलेविरोधात गुन्हा

0

Fraud of brother through false documents in court : Crime against woman in barber shop जळगाव : मयत बहिण व भाऊ मालमत्तेला वारस असताना आपण एकटीच वारस असल्याचे खोटे कागदपत्र न्यायालयात सादर करून सादर करुन भावासह न्यायालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सशंयीत शकुंतला उर्फ रेखा पितांबर फिरके (रा.न्हावी, ता.यावल) यांच्याविरुध्द शुक्रवार, 12 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा
कमलाकर सीताराम भोळे (56, रा.असोदा, ता.जळगाव) यांना अरुण भोळे हे भाऊ तर मिराबाई प्रेमराज पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) व रेखा पितांबर फिरके या दोन बहिणी असून त्यापैकी बहिण मिराबाई व भाऊ अरुण यांचे निधन झाले आहे. भोळे परिवाराची आसोदा शिवारात गट नं.2606 मध्ये 26 आर तर 2604 मध्ये 16 आर.अशी शेती जमीन आहे. रेखा फिरके यांनी 3 जानेवारी 2022 ते 6 जानेवारी 2023 या कालावधीत तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरुन या मालमत्तेला आपण एकटेच वारस असल्याचे दाखवून खोटे पुरावे न्यायालयात सादर केले. त्यानंतर ही शेती ध्रुव जयंत भोळे यांना परस्पर विक्री केली आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कमलाकर भोळे यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने बहिण शकुंतला फिरके यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.


कॉपी करू नका.