भुसावळात उद्या राष्ट्रवादीचा मेळावा : माजी आमदार संतोष चौधरींच्या निर्णयाकडे लक्ष

0

NCP meeting in Bhusawal tomorrow : Attention to former MLA Santosh Chaudhary’s decision भुसावळ : राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांना राष्ट्रवादीने रावेर लोकसभेसाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली मात्र अखेरच्या क्षणी त्यांची उमेदवारी कापून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षाने उमेदवारी कापल्यानंतर चौधरी यांच्यासह कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत ठाम निर्णय घेण्यासाठी भुसावळ शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादीने मेळाव्याचे आयोजन केले आहे.

चौधरींच्या भूमिकेकडे लागले लक्ष
माजी आमदार चौधरी उद्याच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर पुढील निर्णय घेणार आहेत. पक्षश्रेष्ठीकडून राष्ट्रवादीतील बंड न थांबल्यास त्याचा मोठा फटका राष्ट्रवादी उमेदवार श्रीराम पाटील यांना बसण्याची भीती आहे. चौधरी हे अपक्ष वा प्रहार पक्षाकडून उमेदवारी करण्याची शक्यता आहे मात्र सोमवारच्या मेळाव्यात झालेल्या निर्णयानंतर ते पक्षप्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा करतील व पुढील निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीत उफाळलेल्या बंडाळीनंतर चौधरी यांनी वेगळा निर्णय घेतल्यास त्यांचा फटका मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना बसू नये यासाठी वरीष्ठ स्तरावरूनही प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
दरम्यान, मेळाव्यास जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केले आहे.


कॉपी करू नका.