आदर्श आचारसंहितेचे उल्लंघण : शरद पवार गटाच्या जामनेरातील तालुकाध्यक्षाविरोधात गुन्हा

0

Violation of Model Code of Conduct : Case against Sharad Pawar Group’s Jamnera Taluka President जामनेर : जामनेरातील शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षांविरोधात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जामनेर शहरातील सेंट्रल बोहरा स्कुलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारार्थ विचार, विनिमय व नियोजनासाठी विना परवाना बैठक आयोजित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे नेमके प्रकरण
शनिवार, 13 एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील सेंट्रल बोहरा स्कूलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचार्थ विचार, विनिमय आणि नियोजनासाठी विना परवाना बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अंदाजे 300 ते 400 कार्यकर्ते जमले होते. बैठकीच्या ठिकाणी वाद्यांची कोणतीही परवानगी न घेता माईक व स्पीकर लावून कार्यकर्त्यांना निवडणुकीविषयी संबोधित करून उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था ककीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघण केले. याप्रकरणी जामनेर पालिकेचे स्थापत्य अभियंता प्रदीप सुरेश धनके (40) यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष किशोर श्रीराम पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अनिल चाटे हे करीत आहेत.

सहभाग आढळणार्‍यांविरोधातही होणार कारवाई
जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता सुरू आहे. कुणालाही काहीही कार्यक्रम घ्यायचा असेल तर कायद्याप्रमाणे सर्व परवानग्या घेवूनच कार्यक्रम घ्यावा. उल्लंघण केल्यास कारवाईला सामोरे जावेच लागेल. व्हिडीओ शुटींगचा अहवाल आल्यानंतर ज्यांचा ज्यांचा सहभाग आढळून येईल, त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात येईल, असे जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे म्हणाले.


कॉपी करू नका.