जळगावात महिलेच्या बॅगमधून एक लाखांची पोत लंपास

0

जळगाव : जळगावच्या सराफा बाजारात आलेल्या महिलेच्या बॅगेमधून चोरट्याने ब्लेडने बॅग चिरत पर्ससह एक लाखाहून अधिक किंमतीची सोन्याची पोत लांबविली. दुसर्‍या घटनेत महिलेच्या पिशवीतील 30 हजारांची रोकड चोरट्याने लांबविली. शनिवार, 13 रोजी दुपारी टॉवर चौक परिसरात फुले मार्केट आसोदारोडवर हा प्रकार घडला.

ब्लेड लांबवत केली चोरी
जळगाव शहरात वास्तव्यास असलेल्या महिलेची सोन्याची पोत तुटल्याने ही पोत सराफाकडे नेण्यासाठी महिलेने एका लहान पर्समध्ये ठेवली. त्यानंतर ही पर्स एका बॅगमध्ये घेत मुलासोबत टॉवर चौकात आले. सराफ बाजारात जाण्यासाठी पायी चालत असताना गर्दीचा फायदा घेत भामट्याने ब्लेड मारत सोन्याची पोत असलेली पर्स चोरट्याने लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच महिलेने शहर पोलीस ठाणे गाठत कैफियत मांडली.

30 हजारांची रोकड लांबवली
दुसर्‍या घटनेत महिला चणे, फुटाणे विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. माल विक्री झाल्याने नवा माल घेण्यासाठी महिलेने घरातील रोकड व माल विकलेले पैसे मिळून एकूण 30 हजारांची रोकड पिशवीत भरुन टॉवर चौकात आली. ही महिला पायी चालत जात असताना भामट्याने त्यांच्या पिशवीतील 30 हजारांची रोकड अलगत काढून घेत पलायन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने तत्काळ शहर पोलीस ठाणे गाठत पैसे लांबविल्याची तक्रार केली. या दोन्ही घटनांची दखल घेत महिला पोलीस तसेच पोलीस कर्मचारी तत्काळ दोन्ही तक्रारदार महिलांना सोबत घेत स्पॉटकडे रवाना झाले.


कॉपी करू नका.