वरणगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लांबविणार्‍या संशयीताला अटक

0

Suspect arrested for stealing old man’s gold ring from Warangaon भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील अष्टभुजा माता मंदिराजवळून एका वृद्धाची 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी लांबवण्यात आली होती. ही घटना मंगळवार, 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता घडली होती. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा पद्धत्तीने गुन्हे करणार्‍यात संशयीत डिगंबर कौतीक मानकर (मोहन टॉकीज, जळगाव) या तरबेज असल्याने जळगाव गुन्हे शाखेने त्यास आसोदा रोड भागातून रविवार, 14 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपीला अखेर बेड्या
भास्कर लोटन बाविस्कर (79, रा.शिवाजीनगर, वरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार, 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ते वरणगाव शहरातील अष्टभुजा माता मंदिराजवळ आले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली होती. वरणगाव पोलिसात या प्रकरणी 12 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव शहरातील असल्याचे निष्पन्न आरोपी डिगंबर कौतीक मानकर (मोहन टॉकीज, जळगाव) याला याला आसोदा रोड येथून 14 रोजी अटक केली. त्याने गुन्ह्याती कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्याला वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर आंभोरे, महेश महाजन, विजय महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, अक्रम शेख, किरण चौधरी, रणजीत जाधव आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.