आमदार शिरीष चौधरींच्या माध्यमातून रावेर लोकसभेत धनवान उमेदवाराला तिकीट : अनिल चौधरींचा दावा

भुसावळातील निर्धार मेळाव्यात फुंकले रणशिंग : म्हणाले ; चौधरी परिवार कुटनितीचे बळी : आता तोंडाला फेस आणणार !

0

Ticket to rich candidate in Raver Lok Sabha through MLA Shirish Chaudhary: Anil Chaudhary’s claim भुसावळ : चौधरी परिवार कुटनितीचा नेहमीच बळी ठरत आला आहे, राष्ट्रवादीसोबत मोठ्या भाऊंनी निष्ठा ठेवली मात्र तीन ते चार वेळेस त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. माजी आमदार संतोषभाऊंनी तिकीट मागितलेच नव्हते मात्र शरद पवारांनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले मात्र शक्तीप्रदर्शन पाहून आता संतोष चौधरीच खासदार होतील, अशी भीती वाटल्याने कुटनिती आखण्यात आली व धनवान उमेदवार श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभेचे तिकीट देण्यात आले. हे सर्व राजकारण आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून घडले असून याची किंमत त्यांना आगामी निवडणुकीत मोजावी लागेल, असा दावा प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी भुसावळातील निर्धार मेळाव्यात केला. प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांच्या परवानगीचे आपण मोठ्या बंधूंसोबत ताकदीने उभे असल्याचा दावा त्यांनी केला.

आता लढाईचे नाही तर जिंकायचे
आपल्या आक्रमक शैलीत अनिल चौधरी म्हणाले की, ज्यांनी हे सर्व घडवून आणले त्यांचा हिशोब रावेर विधानसभेच्या निवडणुकीत आपण चुकता करू. ज्या गावाचा आम्ही विकास केला त्या गावाहून आम्हाला बाहेर काढण्यात आले. जिल्हा बँकेतही आपल्या भावाला चेअरमन करू देण्यात आले नाही. संतोष चौधरी नकोच म्हणून आतादेखील रावेर लोकसभेत राजकारण झाले व अचानक चौकडीकडून सूत्रे फिरवली व भावाचे तिकीट कापण्यात आले. मात्र पक्षाने तुम्हाला (संतोष चौधरींना उद्देशून) धोका दिला मात्र निष्ठावान कार्यकर्ते व तुमच्यावर प्रेम करणारी जनता सोबत असल्याने आता निर्धार पक्का करून रावेर लोकसभेत ताकद दाखवून देवू, असेही अनिल चौधरी म्हणाले.

तर यांच्या तोंडाला फेस आणणार !
हे सर्व राजकारण कुणाच्या आशीर्वादाने घडले आहे हे जनतेला ठावूक आहे. आता नुसतेच लढाईचे नाही तर जिंकायचे आहे. विरोधकांना आम्ही कधीच मोजत नाही व मोजणारही नाही मात्र यांच्या तोंडाला फेस आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सूचक विधानही त्यांनी केले. चौधरी परिवार 40 वर्ष संघर्ष भोगत आला आहे मात्र लढायचे नाही तर जिंकायचे आहे, असेही ते म्हणाले. भाजपाला नाव ठेवून उपयोग नाही मात्र राष्ट्रवादीनेच भाजपाआडून हा गेम केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत आपण याबाबत निश्चित विचारणा करू, असेही त्यांनी सांगितले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी आमदार संतोष चौधरी, प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगरसेवक उल्हास पगारे, सलीम पिंजारी, संगीता ब्राह्मणे, आऊ चौधरी, दीपक मराठे, फिरोज शेख, राजेंद्र चौधरी, आशिक खान शेर खान, विनोद कोळी, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.