भाजपाचे अखेर ठरले : सातार्‍यात छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी

0

BJP is finally decided : Chhatrapati Udayanaraje Bhosale’s candidature in Satara सातारा : महायुतीकडून अधिकृतरित्या सातारा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती मात्र आता लोकसभेसाठी सातार्‍यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. सातारा मतदारसंघात नुकतीच महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याने आता शिंदे विरोधात उदयनराजे भोसले यांच्यात लढत होणार आहे.

अखेर सातार्‍याची उमेदवारी जाहीर
शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते मानले जातात. पक्षफुटीनंतरही शशिकांत शिंदे शरद पवारांसोबत कायम राहिले मात्र याच मतदारसंघात महायुती कुणाला उमेदवारी देणार हा प्रश्न होता. उदयनराजे भोसले हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यासाठी राजेंनी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती मात्र सातारा मतदारसंघाची उमेदवारी घोषणा होण्यास विलंब लागत होता.

सातार्‍याची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे राहणार की भाजपा लढवणार हा प्रश्न होता. उदयनराजे भोसले यांनी कमळ चिन्हाशिवाय इतर चिन्हावर लढण्यास नकार दिल्याची माहिती होती त्यामुळे या जागेवरून महायुतीत चर्चा सुरू होती. अखेर ही जागा महायुती भाजपाकडे गेली आहे.

उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी या मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. श्रीनिवास पाटील आणि भाजपाकडून उदयनराजे भोसले यांच्यात ही लढत झाली. मात्र त्या लढतीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. त्यानंतर भाजपाने उदयनराजेंची राज्यसभेवर निवड केली.


कॉपी करू नका.