15 हजारांची लाच भोवली : शिंदखेड्यातील लाचखोर ग्रामसेविका धुळे एसीबीच्या जाळ्यात

0

धुळे : विकासकामे केल्याच्या मोबदल्यात बिलाचा धनादेश काढून देण्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना शिंदखेडा ग्रामसेविका राजबाई शिवाजी पाटील (42) यांना धुळे एसीबीने शिंदखेडा गावातील राहत्या घरातून अटक केली.

असे आहे लाच प्रकरण
30 वर्षीय तक्रारदार यांचा शेती व ठेकेदारीचा व्यवसाय आहे. त्यांनी चौगाव, ता.शिंदखेडा ग्रामपंचायत हद्दीत पेव्हर ब्लॉकचे व रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले. या कामाचा निधी मंजूर होऊन ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा झाला होता. तक्रारदार यांना त्यांच्या देयकापोटी धनादेश अदा करण्यासाठी ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी 4 एप्रिल रोजी 25 हजारांची लाच मागितली व 15 हजारात तडजोड करण्यात आली. धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. शिंदखेडा येथील राहत्या घरी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, बडगुजर आदींनी ही कारवाई केली.


कॉपी करू नका.