पळासनेरनजीक 11 लाखांचा अफू जप्त : दोघे जाळ्यात

शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : लसणाआड होत होती वाहतूक : अफू तस्करांमध्ये खळबळ

0

Opium worth 11 lakhs seized near Palasneran: Two in the net शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक्र 52 वरील पळासनेर गावाजवळ एका ट्रकमधून 10 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मानवी मेंदूला गुंगी आणणारा अफू जप्त केल्याने तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातील ट्रक चालकासह दोघांना अटक करण्यात आली. सलामुद्दीन निजामुद्दीन (42, रा.दमाखेडी, ता.सितामऊ, जि.मंदसोर, मध्यप्रदेश) व क्लीनर अशोक जगदीश चौहाण (30, रा.मानंदखेडा, ता.जावरा. जि.रतलाम, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मंगळवार, 16 रोजी अफूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पळासनेरजवळ नाकाबंदी लावण्यात आली. मध्यप्रदेश राज्यातील सेंधवाकडुन शिरपूरकडे ट्रक (आर.जे.09 जी.सी.4569) आल्यानंतर त्याची झडती घेतली असता लसणाआड मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधित अफुचे सुकलेले बोंडे (डोडा) ची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवार, 16 रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजता ही कारवाई करण्यात आली. 10 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 52 किलो वजनाचे मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधीत अफुचे सुकलेले बोंडे (डोडा) व 15 लाखांचा ट्रक जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक श्रीराम पवार, बाळासाहेब वाघ, कृष्णा पाटील, बाळासाहेब वाघ, रफिक मुल्ला, जयराज शिंदे, संतोष पाटील, ठाकरे, प्रवीण धनगर, मोहन पाटील, योगेश मोरे, स्वप्नील बांगर, संजय भोई, भूषण पाटील, रणजीत वळवी यांनी केली.


कॉपी करू नका.