सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात अष्टमी निमित्ताने होम हवन

सहा जोडप्यांच्या हस्ते होम हवन : दर्शनासाठी झाली गर्दी

0

Home havan on the occasion of Ashtami in Satapuda resident Ai Manudevi temple यावल : यावल तालुक्यातील आडगाव येथून जवळच असलेल्या सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. मंगळवारी अष्टमी निमित्ताने होम हवन कार्यक्रम पार पडला. सकाळपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. सहा जोडप्यांच्या हस्ते येथे वेधशास्त्र संपन्न महाराजांकडून विधीवत होम हवन पार पडले. अष्टमीनिमित्ताने श्री क्षेत्रावर सकाळपासूनच दर्शनाकरीता भाविक-भक्तांची गर्दी झाली.

दर्शनार्थ भाविकांची गर्दी
यावल तालुक्यातील पश्चिम भागात आडगाव, ता.यावल या गावापासून सातपुड्याच्या वनराईत असलेल्या श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. यात मंगळवारी चैत्र नवरात्रोत्सवातील अष्टमी होती. अष्टमी निमित्ताने येथे होम हवन कार्यक्रम घेण्यात आला. सकाळपासून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली. अभय पिंगळे व करिष्मा अभय पिंगळे, सुरेश सूर्यवंशी व शैलजा सूरेश सुर्यवंशी (रा.कासोदा, ता.एरंडोल), निलेश पिंगळे व दीपाली पिंगळे (रा.आभोणा), भूषण चौधरी व हर्षदा भुषण चौधरी (रा.जळगाव), खुशाल पाटील व स्वप्ना खुशाल पाटील (रा.कडगाव), पंकज पिंगळे व प्रांजल पंकज पिंगळे (रा.नाशिक) या सहा जोडप्यांच्या हस्ते होम हवन पार पडले.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
संपूर्ण धार्मिक विधी वेधशास्त्र संपन्न स्वानंद सुधाकर धर्माधिकारी गुरुजी (किनगाव), कुंदन सुधाकर धर्माधिकारी गुरुजी, ज्ञानेश्वर धर्माधिकारी गुरुजी (जळगाव), काळे गुरुजी वाघोदा, सोनू महाराज (यावल) यांनी पार पाडले. त्यांनी मंदिराचे पुजारी दगडू महाराज यांची मदत केली. सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवात अष्टमी निमित्ताने होम हवन झाले. या संपुर्ण कार्यक्रमाकरीता संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील, नितीन भास्कर पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन.डी.चौधरी,सतीष पाटील, महेंद्र पाटील, विश्वदीप पाटील आदींनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.