जळगावातील केमिकल कंपनीत भीषण आग

कामगार अडकल्याची भीती : लोकप्रतिनिधींनी घेतली धाव

0

A major fire broke out in a chemical company in Jalgaon जळगाव : जळगाव एमआयडीसीमधील मौर्या ग्लोबल लि. केमिकल कंपनीला बुधवार, 17 रोजी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही तर आगीमुळे मोठा स्फोट होऊन त्यामधील केमिकलने देखील पेट घेतली. दरम्यान, आगीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

कामगार अडकल्याची भीती
जळगावातील मौर्या ग्लोबल कंपनीत एकूण 35 कामगार होते. त्यापैकी 15 कामगारांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आल तर आणखी 20 कामगार अडकल्याची भीती आहे.

जळगाव, जामनेर, जैन इरिगेशन कंपनीच्या अग्निशन दलातर्फे आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी आमदार सुरेश भोळे, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी थेट देत माहिती जाणून घेतली.


कॉपी करू नका.