जळगावातील केमिकल फॅक्टरीत भीषण आग : एक कामगार होरपळून ठार : पाच गंभीर

0

Heavy fire in chemical factory in Jalgaon :  One worker was killed by running away : Five seriously जळगाव : जळगाव शहरातील एमआयडीसी कंपनीतील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला असून पाच कामगार 90 टक्क्यांहून अधिक गंभीर जखमी झाले आहेत शिवाय 15 हून अधिक कामगार 60 ते 70 टक्के होरपळले आहेत. बुधवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता घडली आहे. जखमींना खाजगी तर काहींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, समाधा पाटील (जळगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे तर एक कामगार अद्याप बेपत्ता आहे.

आगीचे कारण अस्पष्ट
जळगाव शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीत बुधवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता कंपनीत केमिकल कंपनीत भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याची मात्र माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन बंब, महानगरपालिकेचा अग्निशमन बंब, जैन हिल्स येथील अग्निशमन बंब असे 3 ते 4 अग्निशमन बंब घटनांसाठी दाखल झाले.

यावेळी लागलेल्या आगीत आगीचे मोठे लोळ बाहेर पडताना दिसून येत होता. सकाळच्या शिफ्टमध्ये काम करणारे 20 हून अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेले. आगीची माहिती मिळाल्यानंतर खाजगी व शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. जखमी व भाजलेल्या कामगारांना तातडीने मेहरून येथील सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

यातील पाच कामगारांची प्रकृती गंभीर आहे. यात जखमी कामगारांचा आकडा वाढविण्याची शक्यता आहे. यावेळी एमआयडीसीतील कंपनी आणि हॉस्पिटल येथे जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारांची आणि नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.

 

 

 


कॉपी करू नका.