जळगावात धूम स्टाईल विवाहितेची पोत लांबवली


जळगाव (6 ऑगस्ट) : दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी जळगावातील महिलेची धूम स्टाईल पोत लांबवली. ही घटना अयोध्या नगरातील महेश प्रोव्हीजनसमोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
जळगाव शहरातील अयोध्या नगरात लक्ष्मी लक्ष्मीकांत सोनवणे (55) या वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्या परिसरात आलेल्या महादेव मंदिरात गेल्या असता मंदिरात दर्शन घेवून त्या घरी परतत असतांना त्यांच्या समोरील रोडवरुन दोन दुचाकीस्वार तरुण त्यांच्या दिशेने येत होते. यातील दुचाकी चालविणार्‍याने हेल्मेट घातलेले होते तर मागे बसलेल्या रेनकोट घालून तोंडाला रुमाल बांधलेला होता. चोरट्यांनी लक्ष्मी सोनवणे यांच्या गळ्यातून दीड लाख रुपये किंमतीची पाच तोळे सोन्याची पोत आणि 7 हजार 500 रुपयांची सोन्याचे आणि काळे मणी असलेली पोत जबरीने ओढून नेत ते हॉटेल जानव्हीच्या दिशेने पळून गेले.

दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातून जबरीने पोत लांबबताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरातील लोकांनी त्याठिकाणी गर्दी केली. मात्र तो पर्यंत चोरटे तेथून पसार झाले याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


कॉपी करू नका.