मेहुण्याच्या खात्याची बँक खातेदार असल्याचे भासवत मागितली माहिती : भुसावळातील शालकाविरोधात गुन्हा


भुसावळ (15 ऑगस्ट 2024) :अ‍ॅक्सीस बँकेचा खातेदार नसतानाही नात्याने शालक असलेल्या संशयीत आरोपीने अर्ज करीत खातेदारकाच्या नावाचे स्टेटमेंट मागितल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी एकाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शालकाविरोधात गुन्हा दाखल
कुंदन धनलाल जैस्वाल (33, वळोदे, ता.चोपडा) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी तथा नात्याने शालक असलेल्या तुषार प्रकाश जैस्वाल (हुडको कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) याने 11 मार्च 2024 रोजी अ‍ॅक्सीस बँकेत जावून तक्रारदाराच्या सहीचा खोटा अर्ज सादर करून खात्याचे डिटेल्स जाणण्यासाठी स्टेटमेंट काढले. हा प्रकार लक्षत्तत आल्यानंतर जैस्वालविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.


कॉपी करू नका.