भुसावळकरांना मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर : नूतन मुख्याधिकारी राजेंद्र फातले

गणेशोत्सवापूर्वी शहरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीसह रस्त्यांची होणार डागडूजी

0

Emphasis on providing basic facilities to Bhusawalkars : New Chief Executive Rajendra Fatle भुसावळ (5 सप्टेंबर 2024) : भुसावळकरांना मूलभूत सुविधा पुरवण्यावर आपला प्रथम भर राहणार असून आगामी गणेशोत्सवात भाविकांना सर्वोतोपरी सुविधा देण्यासाठी पालिका कटीबद्ध असेल, अशी ग्वाही भुसावळचे नूतन मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी दिली. मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत सहाय्यक आयुक्तीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मालेगाव महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले (Chief Executive Rajendra Fatle) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी त्यांनी वाघमोडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. याप्रसंगी अधिकारी व कर्मचार्‍यांतर्फे फातले यांचे स्वागत तर वाघमोडे यांना निरोप देण्यात आला.

अधिकार्‍यांची आढावा बैठक : मूलभूत समस्या सोडवणार !
राजेंद्र फातले यांच्याशी ‘तरुण भारत’ने संवाद साधला असता ते म्हणाले की, मंगळवारी पदभार घेतल्यानंतर बुधवारी पालिकेतील सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेतली. अधिकार्‍यांचा संप असलातरी शहराची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सर्वांना बोलावून घेण्यात आले व भुसावळ शहरातील नेमक्या समस्या जाणून घेतल्या व या समस्या सोडवण्यावर आपला आता भर असेल. नागरिकांना रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा पुरवण्यबाबत पालिकेचे प्राधान्य असेल.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आली असून पावसाने उघडीप दिल्यास रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात येईल अथवा पाऊस कायम राहिल्यास मुरूमांनी रस्त्यांची डागडूजी करण्यात येईल. शहरातील स्वच्छतेचा देखील आढावा घेण्यात आला असून त्याबाबतही विशेष मोहिम राबवण्यात येईल.


कॉपी करू नका.