गणेश मंडळांनी समाजाला प्रबोधन करणार्‍या देखाव्यांचे करावे सादरीकरण : रावेरात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी

रावेर शहरात शांतता कमेटीची बैठक : पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन

0

Ganesha Mandal should present scenes that will enlighten the society: Raverat Superintendent of Police Maheshwar Reddy रावेर (5 सप्टेंबर 2024) : गणेशोत्सव आदर्श पद्धतीने व उत्सवाचे पावित्र्य जोपासत साजरे केला जावे. समाजाला प्रबोधन करणारे देखाव्यांचे सादरीकरण आवश्यक असून व्यसनमुक्ती, साक्षरता या मुद्यांवर समाजाचे लक्ष वेधण्यासाठी गणेश मंडळानी प्रयत्न करावेत, अशा सूचना जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी रावेरात दिल्या. शहरातील कमलबाई गर्ल्स हायस्कूलच्या जीमखाना हॉलमध्ये मंगळवारी पोलिसांच्यावतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, सहा.निरीक्षक जाधव, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, तुषार पाटील, मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र फेगडे, वीज वितरणचे मराठे उपस्थित होते.

आपलीही शांतता राखण्याची जवाबदारी
पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी म्हणाले की, सण-उत्सव शांततेत साजरे करण्याची नैतीक जबाबदारी आपली आहे. पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. उत्सव काळात, मिरवणुकीदरम्यान स्वयंसेवक नेमावेत, शहरात उत्सवाच्या मिरवणुकीत गुलालाऐवजी फुले उधळली जातात हा आदर्श असल्याचे ते म्हणाले. सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पद्माकर महाजन, अशोक शिंदे, डॉ.सुरेश पाटील, दिलीप कांबळे, गयास शेख यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी मिरवणुकीत मंडळांनी स्थापना स्थळावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन केले. नवीन मंडळांना परवानगी दिली जाणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ.एस.पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, सोपान साहेबराव पाटील, शैलेन्द्र अग्रवाल, नितीन पाटील, सुरेश चिंधू पाटील, नीळकंठ चौधरी, जे.आर.पाटील, संतोष पाटील, विजय लोहार, बाळू शिरतुरे, नामदेव महाजन, ई.जे.महाजन, भाऊलाल महाजन, पंकज वाघ, मेहमूद शेख, सुधाकर नाईक, डी.डी.वाणी उपस्थित होते.


कॉपी करू नका.