निकोप समाजासाठी महिलांप्रती आदर अन् सन्मान आवश्यक : अन्नपूर्णा सिंग

फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात कार्यक्रम

0

फैजपूर (5 सप्टेंबर 2024) : भारतात संविधानानुसार कायद्यांची कडक अंमलबजावणी असूनही महिला अत्याचार, सायबर क्राईम, विनयभंग व बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी याविषयी सजग, सतर्क राहून स्वतःचे संरक्षण करावे व सोबतच समाजातील वातावरण पोषक, सकारात्मक व आनंददायी राहण्यासाठी सहयोग द्यावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी व्यक्त केले महिला, मुलींवरील वाढत्या अत्याचार घटनांच्या पार्श्वभूमीवर धनाजी नाना महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
उपप्राचार्या प्रा.डॉ.कल्पना पाटील, पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.मनोहर सुरवाडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.हरीष नेमाडे, प्रा.डॉ.जयश्री पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र बी वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
प्रास्ताविक प्रा.डॉ.जयश्री पाटील यांनी केले. प्रा.डॉ.कल्पना पाटील यांनी अन्नपूर्णा सिंह यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन छाया शिरसाळे यांनी तर आभार श्रद्धा नाथजोगी यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ.सीमा बारी, डॉ.सरला तडवी, डॉ.पल्लवी भंगाळे, प्रा.नाहीदा कुरेशी, प्रा.जयश्री फिरके, प्रा.धीरज खैरे, प्रा.डॉ.शरद बिर्‍हाडे, प्रा.वसुंधरा नेहते, कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपू, शेखर महाजन आदींनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.