देशात जगातील सर्वोत्कृष्ट व बळकट संविधान : त्यात बदल अशक्य !

भुसावळात संविधान यात्रेच्या जागर सभेत मान्यवरांचा सूर

0

भुसावळ (5 सप्टेंबर 2024) : जगातील सर्वोत्कृष्ट व बळकट संविधान आपल्या देशाचे आहे मात्र काँग्रेसकडून सातत्याने देशात हुकूमशाही व मनुशाही येणार असल्याची भीती जनतेला दाखवली जात आहे यामुळे देशात भीतीचे वातावरण आहे मात्र संविधानात बदल आहे. देशाचे संविधान अमृत महोत्सवी वर्षात पर्दापण करीत असून संविधानावर होणारे हल्ले या अनुषंगाने संविधान जागर यात्रा काढण्यात आली असल्याचे विचार भुसावळात मान्यवरांनी व्यक्त केले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरात जागर यात्रेच्या निमित्ताने रथाचे आगमन मंगळवार, 3 रोजी झाले. यावेळी लोणारी समाज मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात संविधात बदल अशक्य असल्याचे यावेळी सांगितले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे होते. यावेळी वक्ते अ‍ॅड.वाल्मीक तात्या निकाळजे (बीड), विजयराव गव्हाळे, राजेंद्र गायकवाड (नाशिक), आकाश अंभोरे (अकोला), स्नेहा भालेराव (मुंबई), योजना ठोकळे (मुंबई), कश्यप साळुंखे (पुणे), मिलिंद इनामदार (सांगली), धर्मपाल मेश्राम (नागपूर), राजू माने (सोलापूर) यांनी संविधानाला अनुसरून सभेला संबोधित केले. यावेळी शहराचे प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नागेश्वर साळवे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, अजय नागराणी, प्रशांत निकम, धनराज बाविस्कर, गौरव आवटे आदींची उपस्थिती होती. राजेश्री सुरवाडे व राजेश्री सोनवणे यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. यशस्वीतेसाठी भुसावळ नियोजन समिती प्रमुख राहुल वसंत तायडे, चेतन सावकारे, प्रेमचंद तायडे, संतोष ठोकळ, रवींद्र दाभाडे, भरत उमरीया, आकाश आव्हाड यांनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.