अंधाराचे मळभ दूर : भुसावळातील पथदिव्यांच्या दुरुस्तीला वेग
भुसावळ (5 सप्टेंबर 2024) : गणेशोत्सव तोंडावर आल्यानंतरही शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील तसेच कॉलनी भागात काळात अनेक पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती शिवाय शांतता समितीच्या बैठकीतही नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला होता. पालिकेने तक्रारींची दखल घेत बुधवारपासून शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील हायमास्टची दुरुस्ती सुरू केली आहे. कंत्राटदार प्रणय चौधरी यांच्या माध्यमातून शहरातील खासदार निधीतील बंद पडलेले हायमास्ट तसेच पालिकेचे पथदिवे दुरुस्त केले जात आहे. बुधवारी यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते नाहाटा महाविद्यालयापर्यंत रस्त्यावर काम करण्यात आले.
नागरीकांमधून समाधान
शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील पालिकेच्या पथदिव्यांसह खासदार निधीतून लावण्यात आलेले हायमास्ट बंद पडल्याने रस्त्यांवर अंधाराचे मळभ निर्माण झाले होते. नागरिकांनी या संदर्भात सातत्याने पालिका प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या. याची दखल घेत पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या सुचनेनंतर बुधवारपासून शहरातील शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवरील सेंट्रल पोलवरील पथदिवे दुरुस्तीला वेग देण्यात आल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. पथदिव्यांच्या दुरुस्तीप्रसंगी कंत्राटदार प्रणय चौधरी उपस्थित होते.