भुसावळ शहरात उद्या एस.एस.मोबाईल गॅलरीचा शुभारंभ
भुसावळ (14 सप्टेंबर 2024) : शहरातील स्टेशन रोडवरील जनता गॅलरी शेजारी रविवार, 15 रोजी सकाळी 10 वाजता एस.एस.गॅलरीचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमास भुसावळचे आमदार संजय सावकारे, माजी आमदार संतोष चौधरी, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या शिवाय मलिक सिंग छाबरा, इंद्रजीत सिंग छाबरा, माजी प्रभारी नगराध्यक्ष मुन्ना तेली, अॅड.भगवती गामोट, कर सल्लागार राजेश शर्मा आदींची उपस्थिती राहणार आहे.
एकाच छताखाली टीव्ही, मोबाईल्ससह सर्व काही
शहरातील जनता गॅलरी शेजारी एस.एस.मोबाईल या दालनात नामांकीत कंपन्यांचे मोबाईल, ईअरफोन तसेच नामांकीत अॅपल कंपनीचे विविध फोन दर्जेदार किंमतीत उपलब्ध होणार आहेत शिवाय एका मोबाईलची खरेदी केल्यानंतर त्यावर चार ऑफर ग्राहकांना मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी गॅलरीत संपर्क (89561-38461) वर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.