आदिवासी कोळी जमात प्रमाणपत्र मिळण्यासाठी मुक्ताईनगरात आंदोलन
मुक्ताईनगर (19 सप्टेंबर 2024) : आदिवासी कोळी जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेल्या 13 दिवसापासून मुक्ताईनगर तहसील कार्यालय आवारात आंदोलन छेडण्यात आले आहे. 13 दिवस उलटूनही आदिवासी टोकरे कोळी आंदोलनाची शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही.
तर तहसीलमध्ये बिर्हाड मोर्चा
रास्त व संविधानिक मागणीबाबत शासन अद्यापही बेदखल असून परिणामी आदिवासी टोकरे कोळी जमातीचे शैक्षणिक, सामाजिक नोकरीविषयक नुकसान होत आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. प्रलंबित व नवीन दाखल केलेल्या प्रकरणांना तत्काळ अनुसूचित जमातीचे दाखले देण्यात यावे व गुरुवार, 19 पर्यंत प्रमाणपत्र निर्गमित करावे अन्यथा आदिवासी टोकरे कोळी जमात मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये भव्य असा आदिवासी टोकरे कोळी जमात हजारोंच्या संख्येने बिर्हाड घेऊन ठिय्या आंदोलन करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात नितीन प्रल्हाद कांडेलकर, विनोद सोनवणे, नीना पाटील, चंद्रकांत भोलाणे, ज्ञानेश्वर कठोरे, शिवाजी कठोरे, पांडुरंग हरी बाविस्कर, राजेंद्र सांगळकर, डॉ.दिवाकर पाटील, अशोक कांडेलकर, राजू जाधव, रतिराम महाराज खामखेडा, संजय कोळी, बबलू कोळी, आनंदराव कोळी व समाजबांधव सहभागी झाले आहेत.