दीपनगर मुख्य अभियंतापदी प्रकाश खंडारे
पाच महिन्यांत राजू घुगे यांची उचलबांगडी
भुसावळ : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंतापदी खापरखेडा येथील उपमुख्य अभियंता प्रकाश खंडारेंची पदोन्नीवर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, 14 ऑगस्ट रोजी चंद्रपूर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंता राजू घुगे यांची बदली करण्यात आल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत त्यांची खापरखेडा येथे उचलबांगडी करण्यात आली आहे. कोरोनाच्या अनलॉकमध्ये ऑगस्ट महिन्यात तत्कालीन मुख्य अभियंता पंकज सपाटे यांची चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्रात बदली झाली होती. त्यांच्या जागी चंद्रपूर येथून राजू घुगे यांची भुसावळात मुख्य अभियंतापदी बदली झाली मात्र घुगे यांची पुन्हा अवघ्या पाच महिन्यांत उचलबांगडी झाली आहे. घुगे यांच्या प्रशासकिय बदलीचे आदेश महानिर्मितीचे कार्यकारी संचालक बी.वाय.मंता यांनी शुक्रवारी काढले आहेत.

