आईच्या दागिण्यांवर मुलानेच मारला डल्ला : निरूळची घटना


रावेर : तालुक्यातील निरुळ येथे पोटच्या गोळ्याने च आपल्या आईचे 50 हजारांचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात रावेर पोलिसांनी तपसाचे चक्र फिरवत मुलाला अटक केली आहे. जितेंद्र खैरे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. निरूळ येथील सयाबाई खैरे या त्यांच्या पती मुलासह राहतात. 15 रोजी रात्री त्यांच्या घरात चोरी झाली. यात चोरट्याने 20 हजारांची रोकड, सात गॅ्रमची सोन्याची अंगठी, 50 भार चांदी लांबवली होती. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर आरोपी हा फिर्यादीचा मुलगा जितेंद्र खैरे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव, नितीन डांबरे, महेश मोगरे, जगदीश पाटील, प्रमोद पाटील, सुरेश मेढे, सुकेश तडवी, विशाल पाटील यांनी ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !