खासदार संजय राऊत म्हणाले : कारवाईसाठी फक्त एकनाथ खडसेंचे नातेवाईक आणि नवाब मलिकांचे जावई दिसतात का?


मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केलेली अटक आणि अजित पवारांवरील प्राप्तीकर खात्याच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, कितीही उड्या मारा आणि नाचत राहा. 2024 नंतर भेटू. त्यानंतर जे होणार आहे ते पाहू. मग बघा केंद्रीय तपास यंत्रणा कुणापुढे गुडघे टेकतात ते. तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका. तुमच्याही फाईली तयार आहेत. तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती आहेत. कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे आमच्याकडे आहे, असा इशारा राऊत यांनी दिला. राऊत म्हणाले की, कारवाईसाठी फक्त एकनाथ खडसेंचे नातेवाईक आणि नवाब मलिकांचे जावई दिसतात का? इतरांचे नातेवाईक का दिसत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राच्या बिघडलेल्या राजकारणाची जवाबदारी भाजपाची
राऊत पुढे म्हणाले की, कारवाईसाठी फक्त एकनाथ खडसेंचे नातेवाईक आणि नवाब मलिकांचे जावई दिसतात का? इतरांचे नातेवाईक का दिसत नाही? महाराष्ट्रात कायम चांगलं राजकारण होतं. आता ते बिघडवलं जात आहे. त्याची जबाबदारी भाजपवर राहणार आहे. आज ते हे सर्व पाहून टणाटणा उड्या मारत आहेत. पण एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. काही लोकं म्हणतात दिवाळी नंतर असं करू तमूक करू. पण या सर्वांना बाथरुममध्ये तोंडं लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात, असा इशारा देतानाच पण करायचे का आम्ही? तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचे का? असा सवाल त्यांनी केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !