खासदार रक्षा खडसेंचा ठाकरे सरकारवर निशाणा : घोषणा व भाषणाने प्रश्न सुटणार नाही
जळगाव : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केवळ घोषणा करून आणि भाषणे देऊन शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाहीत, अशी बोचरी टीका रक्षा खडसे यांनी केली आहे.राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा व खासदार रक्षा खडसे यांनी आघाडी सरकारवर टिका केली आहे.
शेतकर्यांकडे पूर्ण दुर्लक्ष
ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकर्यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. खूप कमी मदत शेतकर्यांना देण्यात आली त्यामुळे अनेक शेतकर्यांचे मला फोन येत आहेत. सरकारने शेतकर्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहे. शेतकर्यांकडे लक्ष द्यावे, असे
खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.


उद्धवा अजब तुझे सरकार
यापूर्वी, ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. आर्यन खाननंतर वेळ मिळाला असेल तर ठाकरे सरकारने आता शेतकर्यांकडे पाहावे, असा टोला मेटेंनी लगावला. गेल्या 10 महिन्यात 159 आत्महत्या झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनासाठी आणि सरकारसाठी ही बाब लाजीरवाणी आहे. प्रशासनाने किती आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या घरी जाऊन चौकशी केली, अशी विचारणा करत मेटे यांनी दिवाळीनंतर शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असून हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे.