भुसावळातील साने गुरुजी नगरवासी भोगताय हाल
मूलभूल सुविधांची वाणवा : तर निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 24 प्रभाग मध्ये येणार्या सानेगुरुजी नगर भागात पालिकेकडून मूलभूत सुविधादेखील पुरवल्या जात नसल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. रस्त्यांची झालेली दुरवस्था तसेच तुंबलेल्या गटारींमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी बेदखल असल्याने नागरीकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. पालिकेने सुविधा न पुरवल्यास नागरीक पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या पावित्र्यात आहेत.
गटारी काढण्याचा पालिकेला विसर
प्रभाग क्रमांक 24 मध्ये येणार्या साने गुरूजी नगरात गेल्या अनेक दिवसांपासून गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येवून रहिवासी पडत असल्याचे प्रकार घडत आहेत. तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. गटारी स्वच्छ होत नसल्याने नागरीकांना स्वतः गटारी स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. आबालवृद्धांसह महिलावर्गाची होणारी गैरसोय लक्षात घेता या भागातील रस्त्यांच्या कामांसह गटारींचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा या भागातील नागरीकांनी व्यक्त केली आहे.
