वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांना बसणार आळा
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे : नाहाटा महाविद्यालयात रोड सेप्टी कार्यशाळा
भुसावळ : भारत दररोज सर्वाधिक अपघातात होतात शिवाय एका दिवसात भारतात अपघातात तब्बल 414 लोक मृत्युमुखी पडतात तर एका तासात 17 लोक मृत्यू पावतात. अपघात होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाहनधारकांकडून नियमांना तिलांजली देणे होय. रस्त्याचे नियम माहीत नसल्यास रस्ते मृत्यूचा सापळा बनतात त्यामुळे वाहन चालवताना नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास व वेग मर्यादेचे भान ठेवल्यास अपघात टळतील, असा आशावाद त्यांनी येथे व्यक्त केला. भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी महावद्यालयातील शिस्त समिती व वेल्सपन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाहतुकीचे नियम व रोड सेफ्टी’ या विषयावर कार्यशाळा झाली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील होते. विचारमंचावर प्रमुख पाहुणे बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, नाम्रपाली गोंडाणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.ई.भंगाळे, उपप्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे, इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा शिस्त समिती प्रमुख प्रा.डॉ.अनिल हिवाळे यांनी मांडली.

कायद्याबाबत तरुणांमध्ये उदासीनता : राहुल गायकवाड
बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी वाहतूक कायदा स्पष्ट करून तरुणांमध्ये कायद्याबाबत उदासीनता असल्याचे सांगितले. वाहतूक नियमाप्रमाणे नंबर प्लेट नसणे, हेल्मेट न घालणे, लायसन्स नसणे अशा महत्त्वाच्या गुन्ह्यांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागृत केले. वाहतूक नियम पाळणे गरजेचे असल्याचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील यांनी सांगितले. द्वितीय सत्रात नाहाटा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे (पी.एस.आय) यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन, पोलिसांचा आदर करा असा संदेश दिला. संतोष वंजारी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील विविध रस्त्याच्या सांकेतिक चिन्ह व घ्यावयाची सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले.
62 पोस्टरचे सादरीकरण
तिसर्या सत्रामध्ये वाहतूक नियम व रोड सेफ्टी या विषयावरील पोस्टर प्रदर्शन झाले. या पोस्टर प्रदर्शनांमधून महाविद्यालयातील विविध 62 पोस्टर विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यातून प्रथम पारीतोषिक गायत्री बजाज, द्वितीय रीतीक इंगळे, तृतीय सारंग नकवाल व दोन उत्तेजनार्थ बक्षीस ईश्वरी लढे व मेघा इंगळे या विद्यार्थ्यांना मिळाले. अखेरच्या सत्रात बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी होते. सूत्रसंचालन प्रा. व्ही.ए.सोळुंके तर आभार प्रा.डॉ अनिल हिवाळे यांनी मानले.
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
यशस्वीतेसाठी शिस्त समितीच्या प्रा.अजय तायडे, प्रा.जे.पी.पाटील, प्रा.प्रियंका मिस्त्री, प्रा.भाग्यश्री भोळे, डॉ.पी.के.पाटील, डॉ.आर.एस.नाडेकर, डॉ.डी.एम.टेकाडे, प्रा.डी.एन.पाटील, डॉ.स्मिता चौधरी, डॉ.आनंद उपाध्याय, प्रा.संगीता भिरूड, डॉ.गौरी पाटील, भगवान तायडे यांनी अनमोल सहकार्य केले. नाम्रपली गोंडाणे, शोयब शेख, रुपेश गायकवाड आदी उपस्थित होते.