ऑर्डनन्स कर्मचार्‍यांचा जुन्या पेन्शन योजनेत समावेश करा : आयुध निर्माणी कर्मचार्‍यांचे निवेदन


भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचार्‍यांनी जुन्या पेन्शन योजनेत समावेशाच्या मागणीसाठी अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या आदेशावरून सलंग्न युनियनद्वारे गुरूवारी स्थानिक स्तरावर कार्मिक, पेन्शन आणि सार्वजनिक तक्रारी राज्यमंत्र्यांना देण्यासाठी महाप्रबंधकांना मागण्यांचे निवेदन दिले. महाप्रबंधक यांंचे प्रतिनिधी म्हणून संयुक्त महाप्रबंधक बी.देवीचंद, सतर्कता विभागाचे प्रमुख राजेश शर्मा, सुरक्षा सेक्शन प्रमुख आर.एस.मेढे उपस्थित होते. याप्रसंगी महासचिव दिनेश राजगिरे यांनी जुन्या व नवीन पेन्शन मधील फरक कर्मचार्‍यांना सांगितला. युनियनतर्फे जुनी पेन्शन योजना एक जानेवारी 2004 नंतर भर्ती कर्मचार्‍यांना लागू करण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
युनियनतर्फे अध्यक्ष आशिष मोरे, महासचिव दिनेश राजगिरे, किशोर बढे, एससी एसटी ओबीसीचे नितेश तायडे, सूर्यभान गाढे, बीएसकेएस चे संजय अहिरे यांच्यासह नवीन भरतीतर्फे महिला कर्मचारी यांचेतर्फे निवेदन देण्यात आले. निलेश देशमुख, मिलेश देवराले, मोहन सपकाळे, जितू आंबेडकर, नितीन देशमुख, मिलिंद ठोंबरे, गिरीश येवले, विनोद धाडे, रवी सपकाळे, किशोर कोळी, पी.डी.कोतवाल, रेखा आव्हाड, सुनीता शर्मांसह सर्व पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.