भुसावळात 1 ऑक्टोंबर रोजी यशसिध्दी सैनिक सेवा संघातर्फे सैनिकांचा मेळावा


वरणगाव : राज्यातील सेवानिवृत्त सैनिकांचा 1 ऑक्टोबर रोजी भुसावळ शहरात भव्य मेळावा होत आहे. मेळाव्यात विरमाता-पिता, पत्नी यांचा गौरव केला जाणार असल्याचे यशसिद्धी सैनिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल डोंगरदिवे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले. सैनिकांचा समाजात सदैव सम्मान व्हावा या उद्देशाने भुसावळला माजी सैनिकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात 1965-1971 च्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या वीर योद्ध्यांचा सन्मान व सत्कार होईल.

यांची असेल प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जनरल संजय मेस्टन, एव्हीएसएम, व्हीएसएम, एमएम रक्षा विश्लेषक तसेच धम्मज्योती गजभिये आय.ए.एस . आयुक्त बार्टी हे सुद्धा उपस्थित असतील. मेळाव्यात वीर सैनिकांची सैनिक सन्मान रॅलीत वीर सैनिकांची रथातून मिरवणूक निघेल तसेच प्रसंगी सैनिकांचे पथसंचलन होईल. या मेळाव्याला किमान दोन हजार सैनिकांची उपस्थिती राहणार असल्याचे यशसिद्धी सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल डोंगरदिवे म्हणाले.

यांची होती उपस्थिती 
यावेळी सैनिक संघाचे भारत तायडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष मिसाळ, जळगाव जिल्हा संघटक संजय बावस्कर, विदर्भ प्रमुख कैलास खिल्लारे, जळगाव जिल्हाध्यक्ष किरण तायडे, उपाध्यक्ष कैलास बाविस्कर, सहसचिव नवल धुरंदर, माजी सैनिक देवदास मकासरे, माजी सैनिक राजेश डोंगरे, माजी सैनिकपुत्र प्रशांत निकम यांची उपस्थिती होते.


कॉपी करू नका.