शिरपूरात बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची विक्री : 11 हजारांचा मांजा जप्त


Sale of banned nylon manja in Shirpur : Manja worth 11 thousand seized शिरपूर : राज्यात नॉयलॉन मांज्यावर बंदी आली असताना शिरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात मात्र त्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकून 10 हजार 740 रुपये किंमतीचे लहान मोठे असे 434 रीळ जप्त केले. य प्रकरणी मांजा विक्रेत्या दुकान चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विक्रेत्यांमध्ये कारवाईने उडाली खळबळ
राज्यात नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी असताना मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉन मांजा विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे मात्र शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी शहर पोलिस सतर्क आहेत. याबाबत शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. शहरातील पाच कंदील परिसरात असलेल्या तारण जनरल स्टोअर्सवर मंगळवारी सायंकाळी छापा टाकून दुकानातील 10 हजार 740 रुपये किंमतीच्या नायलॉन मांझाच्या लहान मोठे 434 चक्री जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी गोविंद कोळी यांच्या फिर्यादीवरून दुकान मालक रवींद्र भगवानदास जैन (रा.सुमतीनाथनगर कृष्णा व्हॅलीजवळ, करवंद रोड, शिरपूर) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला . तपास हवालदार ललित पाटील करीत आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर, ललित पाटील, लादुराम चौधरी, मनोज पाटील, विनोद आखडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, गोविंद कोळी, प्रशांत पवार आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !