मी जे बोललो ते माझे व्यक्तिगत मत नाही : खासदार संजय राऊत


What I said is not my personal opinion :  MP Sanjay Raut मुंबई : संजय राऊत म्हणाले की, माझे व्यक्तिगत वक्तव्य नाही. संजय राऊत व्यक्तिगत बोलत नाहीत. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता, पक्षाचा नेता, उद्धव ठाकरेंचा सहकारी आहे. त्यामुळे मी जे बोललो ते माझे व्यक्तिगत मत नाही. महाविकास आघाडी टिकावी आणि प्रत्येक घटक पक्षातील नेत्यांविषयी काळजीपूर्वक बोलावी आणि भूमिका घ्याव्यात असं सगळ्यांचे मत आहे. माझे शरद पवारांसोबत बोलणे झाले आहे. पवारांविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे आणि तो राहील. महाविकास आघाडीला तडा जाईल अशी विधाने करू नयेत. यात कुणाला राग येऊ नये असं प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना दिले आहे.

आम्हाला सगळेच सोबत हवे आहेत
राऊत म्हणाले की, आमची महाविकास आघाडी आहे. ज्यांनी अडीच वर्ष महाराष्ट्रात योग्य प्रकारे सत्ता राबवली. त्यावर मी बोलतोय. मी वंचित बहुजन-शिवसेना युतीवर बोलत नाही. या महाविकास आघाडीचे शरद पवार नेते आहेत. देशात भाजपाविरोधात आघाडी उभी करायची असेल तर पवारांचे नेतृत्व आणि सल्ला महत्त्वाचा आहे इतकेच मी बोलतोय. भाजपाविरोधात जी भूमिका घ्यायची ती एका-दुसर्‍याची मक्तेदारी नसते. त्यात आम्हाला सगळे सोबत हवेत असंही राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना स्पष्ट केले. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर माझ्या पक्षाचे नेते नाहीत. पण मी त्यांचा आदर करतो. मी मानतो. आंबेडकरांना आम्ही मानतो. जितके बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यात भिनलेत तितकेच आमच्यातही आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांवर काही टीका-टिप्पणी करायची नाही. ते आमचे सहकारी आहेत. शिवसेनेसोबत त्यांची युती झालीय आम्ही त्यांचा आदर करतो. जेव्हा युती नव्हती तेव्हाही आदर करतच होतो.


कॉपी करू नका.