‘माझी बोली माझी वेब’चे जळगावात शुटींग

खान्देशातील स्थानिक कलावंतांसह लेखकांना संधी


फैजपूर : खान्देशच्या मातीतील कलावंत यापूर्वीही छोट्या पडद्यावर चमकले असून त्यांच्यातील कलेचे कौशल्य पाहता नर्मदास फ्युचर फिल्मतर्फे खानदेशातील लेखकांनी लिहिलेल्या कथांवर आधारीत ‘माझी बोली माझी वेब सिरीज’ या वेब सिरीजचे सध्या जळगावात शुटींग सुरू आहे. प्रत्येक कथेचे लेखक वेगवेगळे असून कथेतील कलाकार सुद्धा त्या-त्या अनुषंगाने वेगवेगळे आहेत. विशेष म्हणजे लेखक दिग्दर्शक कलाकार आणि संपूर्ण टीम ही खानदेशातीलच असून हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम जळगाव जिल्ह्यात राबवला जात आहे. हा पूर्ण उपक्रम पब्लिक फंडिंगच्या माध्यमातून उभा राहत आहे. एक निर्माता नसून अनेक निर्माते आणि उत्स्फूर्त मदतकर्ते आहेत.

वर्षभरात 11 वेबसिरीज होणार
दिग्दर्शक प्रशांत सोनवणे यांनी माय माऊली मनुदेवी, लढा शिक्षणाचा, आणि एक नंबरचा ढ चित्रपट केलेले आहेत. तसेच टीम मध्ये क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून किरणकुमार अडकमोल आणि निर्मिती प्रमुख ऋषीकेश भरत धर्माधिकारी यांचे आहे. सोबत टीम मध्ये ड्रेस डिपार्टमेंट पुनम जावरे, असिस्टंट डिरेक्टर पवन इंदरेकर, सागर आत्तरदे, कॅमेरामन तेजस भंगाळे सांभाळत आहेत. सर्व ऑन स्क्रीन अभिनेत्यांचे नाव मुद्दाम गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले आहेत. या पूर्ण टीम व प्रोडक्शन तर्फे वर्षभरात 11 वेब सिरीज करण्याचा मानस आहे.


कॉपी करू नका.