सीताफळ रबडीतून 150 वर्हाडींना विषबाधा
150 year olds poisoned by Sitaphal Rabdi शिर्डी : मोठ्या थाटा-माटात झालेल्या लग्नानंतर सुमारे दिडशेवर वर्हाडींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार निमगाव येथे रविवारी समोर आला. विशेष म्हणजे या सर्व वर्हाडींनी सीताफळ रबडी खाल्ल्याची माहिती असून त्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. रविवारी लग्न सोहळ्यानंतर दुपारी वर्हाडी जेवले मात्र काही वेळेत त्यांना त्रास होऊ लागल्याने रविवारी रात्री त्यांना शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले.
वैदिक पद्धत्तीने विवाह
शिर्डी येथील रहिवाशी असलेल्या त्रिभुवन कुटुंबियातील मुलीचा विवाह हा पुणेस्थित आल्हाट कुटुंबियांतील मुलाशी रविवारी झाला. वैदिक पद्धतीने फक्त कुटुंबिय व मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला. यात नातेवाईकांनी जेवण केले. त्यानंतर काहीवेळात त्यातील तीन ते चार जणांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला. ज्यांना त्रास झाला, त्यांनी सीताफळ रबडी खाल्ली होती, असे नातेवाईकांनी सांगितले.

