निवडणूक बंदोबस्ताला दांडी : कायम सेवेतून समाप्त झालेले जिल्ह्यातील 65 होमगार्डस् पुन्हा सेवेत होणार रूजू

अमळनेर तालुक्यातील 11 होमगार्डसचा समावेश


अमळनेर (2 फेब्रुवारी 2025) : निवडणूक कामाला दांडी मारणार्‍या 65 होमगार्डची सेवा समाप्त करण्यात आली होती मात्र या 65 होमगार्डसला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिले आहेत. यात अमळनेर तालुक्याच्या 11 होमगार्डसचा समावेश आहे. खासदार स्मिताताई वाघ व आमदार अनिलदादा पाटील यांनी या होमगार्डसला कामावर घेण्यासाठी अशोक नखाते याना पत्र दिले होते.

बंदोबस्त न केल्याने दिले होते सेवा समाप्तीचे आदेश
निवडणूक बंदोबस्ताचे कर्तव्य केले नाही म्हणून जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यातील दत्तात्रय चव्हाण, समाधान पाटील, संदीप पाटील, पुनमचंद हटकर, किशोर पाटील, हितेश पाटील, देविदास नेरकर, राहुल भालडे, दीपक सातपुते , श्रीराम राठोड , विष्णू शेटे याना होमगार्ड अधिनियम 1940 च्या कलम 6(ब), 2 प्रमाणे सेवा समाप्तीचे आदेश दिले होते.

अपिलात मिळाला दिलासा
सेवासमाप्ती केलेल्या होमगार्डसनी अपील केले होते. खासदार स्मिताताई वाघ व आमदार अनिल पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. कोणतीही नोटीस न देता सरळ सेवेतून काढले त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने संबंधितांना परत कामावर घ्या, असे पत्र खासदार वाघ व आमदार पाटील यांनी दिले होते. यावर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी आदेश दिले आहेत. जळगाव, चाळीसगाव, भडगाव, जामनेर, रावेर, धरणगाव, सावदा, पाचोरा, भुसावळ, यावल, वरणगाव येथील होमगार्डसचा समावेश आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !