भारताने कांगारूंना लोळवत फायनमध्ये केली दणक्यात एन्ट्री

India entered the final with a bang, rocking the Kangaroos न्यूज नेटवर्क । दुबई (5 मार्च 2025) : भारतीय संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत फायनल गाठले. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सेट केलेल्या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या भात्यातून दमदार खेळी करीत भारताने फायनलमध्ये दमदाट एन्ट्री केली.
विराट कोहलीने दुबईच्या संथ खेळपट्टीवर 84 धावा करून भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपांत्य सामना जिंकण्यास मदत केली. सहाव्या षटकात कोहलीला फलंदाजीसाठी यावे लागले. येथून, त्याने श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि केएल राहुल सोबत 3 मोठ्या भागीदारी केल्या ज्यामुळे धावांचा पाठलाग सोपा झाला.
कोहली आपलं काम करून गेल्यावर आलेल्या पांड्यानं मेरे जैसा कोई हार्डच नहीं है शो दाखवत भारतीय संघाच्या आयसीसी ट्रॉफी आड येणार्या कांगारूंचा चांगलाच समाचार घेतला. केएल राहुल शेवटपर्यंत मैदानात थांबला आणि जड्डूच्या साथीनं त्याने सिक्सर मारत भारतीय संघाला 4 विकेट्स राखून दाबात विजय मिळवून दिला.
दुबईच्या मैदानात भारतीय संघानं वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या फायनलमधीलच नव्हे तर सातत्याने आयसीसीच्या स्पर्धेत भारताचा हिरमोड करणार्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर केले त्यामुळेच हा विजय खूप मोठा आहे. याशिवाय भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल गाठल्यामुळे यजमान पाकिस्तानलाही ’440 व्होल्टचा झटका’ बसला आहे. कारण आता यजमान पाकिस्तान असले तरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनलही दुबईच्या मैदानातच खेळवली जाईल.
दुबईच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना स्मिथ 73 (96) आणि कॅरीच्या 61 (57) अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघानं 264 धावा करत भारतीय संघासमोर 265 धावांचे आव्हान सेट केले होते. दुबईच्या मैदानातील हे टार्गेट पार करणे मोठे आव्हानच होते. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध नॉकआउट मॅचमध्ये भारताने कधीच एवढ्या धावांचा यशश्वी पाठलाग केला नव्हता. पण विराटनं 84 (98) क्लास खेळी केली. त्याला श्रेयस अय्यर 45 (62), लोकेश राहुल 42(34) यांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर भारतीय संघानं दुबईच मैदान मारत विक्रमी विजयासह फायनलममध्ये दाबात एन्ट्री मारली.




