भुसावळातून जैन मुनींचे वरणगावकडे प्रस्थान
भुसावळ : भुसावळातील जैन स्थानकातून वरणगावकडे निघालेल्या प.पू. युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा.आदी ठाणा- 5 यांनी गुरुवारी रेल्वे कामगार संघटनेचे ललितकुमार मुथा यांच्या निवासस्थानी भेट देत जगातील कोरोना महामारीचा समूळ नायनाट होण्यासह जगात शांती नांदण्यासाठी महामंगलपाठ दिला.
यांची होती उपस्थिती
यावेळी संघपती सुगनचंद सुराणा, पी.पी.कोटेचा, कांतीलाल चोरडीया, गौतम चोरडीया, नरेंद्र चोरडीया, जयंतीलाल सुराणा, संजय सुराणा, प्रमोद चोरडीया, भूषण चोरडीया, सुमित चोरडीया, नितीन सुराणा, समकित सुराणा, पंकज मंडलेचा, शेखर बंब, लोकेश नहार, अक्षय चोरडीया, विशाल चोरडीया, नवीन चोरडीया, नलीन ललवानी, मानस लालवानी, हर्षराज मुथा, अनिता मुथा, मनीषा चोरडिया व इतर महिला व पुरुष जैन श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


