लॉकडाऊनमध्ये मद्य विक्री : दोघांविरुद्ध गुन्हा


चाळीसगाव : लॉकडाऊन असताना मद्यविक्री केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 29 मार्च रोजी सकाळी शहरातील पाटणादेवी रोडवरील पाटणाई हॉटेलात सर्रास मद्यविक्री होत असल्याची माहिती पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार सहा.निरीक्षक एन.ए.सैय्यद, कॉन्स्टेबल संदीप भोई, मदन गोसावी व चंद्रकांत खैरनार आदींनी या हॉटेलावर सकाळी धडक कारवाई करीत सहा हजार 840 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी अशोक वर्मा (25) व अमोल उसरे (23, दोघेही रा.टाकळी प्र.चा) यांच्याविरोधात अमोल पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक एन.ए सैय्यद हे करीत आहेत.

 


कॉपी करू नका.