10 lakhs of prohibited tobacco seized 10 लाखांची प्रतिबंधीत तंबाखु जप्त


नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोंडाईबारी घाटात (घेपवरळलरीळ सहरीं) सुगंधीत तंबाखूचा कंटेनर पोलिसांनी पकडत एकाला अटक केली. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक नितीन पाटील व सहकार्‍यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या मदतीने कोंडाईबारी घाटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सापळा रचून ही कारवाई केली.

शिंदे सरकारची मोठी घोषणा : यंदाच्या गणेशोत्सवासह दहिहंडीवर कुठलेही निर्बंध नाहीच

पाठलाग करून कंटेनर पकडला
विसरवाडी येथुन कोंडाईबारी घाटाच्या दिशेने येणार्या वाहनांची तपासणी करीत असतांना एक अशोक लेलॅण्ड कंपनीचे कंटेनर भरधाव वेगाने येतांना दिसुन आल्याने पोलीस पथकातील अमंलदारांनी हाताच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा दिला . परंतु वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने वाहन पुढे नेले. पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी शिताफीने वाहनाचा पाठलाग करुन ते वाहन थांबवुन ताब्यात घेतले. वाहनावरील वाहन चालका किशोर गुलाब बुवाडे (रा . हिवरा वासुदेव, ता.मुखेड, जि.छिंदवाडा, मध्यप्रदेश) यास कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यामुळे पोलीसांनी दोन पंचासमक्ष वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्या दिसून आल्या. गोण्या उघडून पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधीत तंबाखू मिळुन आली. आरोपीतास सदरची सुगंधीत तंबाखू बाबत विचारपुस केली असता त्याने गुजरात राज्यातील वापी येथुन विकत घेवून नागपूर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले .

विसरवाडी पोलिसात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा
ताब्यात घेण्यात आलेला अशोक लेलॅण्ड कंपनीचा कंटेनर ( क्र.एम.एच.- 40 सी.डी. 7896) यात 9 लाख 72 हजार रुपये किमतीच्या 30 कि.ग्रॅ . वजनाच्या सुगंधीत तंबाखूच्या एकुण 108 गोण्या, 40 लाखाचे अशोक लेलॅण्ड कंपनीचा कंटेनर असा एकूण 49 लाख 72 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन संशयीत आरोपी नामे किशोर गुलाब बुवाडे याच्याविरुध्द् विसरवाडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 188,172,273,328 , सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील , अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार , विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिनेश चित्ते , पोलीस नाईक अनिल राठोड , पोलीस कॉन्सटेबल लिलेश पाडवी , अतुल पानपाटील , नितीन ठाकरे यांनी केली.

द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदावर विजय निश्‍चित : देशभरात जल्लोष

 


कॉपी करू नका.