धक्कादायक ! : विशेष सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांकडील 19 खटले राज्य शासनाने काढले


19 Cases Of Special Public Prosecutor Adv. Praveen Chavan Were Disposed Of By The State Government मुंबई : तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे अ‍ॅड.प्रवीण चव्हाण हे अडचणीत आल्यानंतर आता त्यांच्याकडील सुमारे 19 खटले काढून घेण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. जळगावच्या घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि इतरांना शिक्षेपर्यंत पोहचवल्याने अ‍ॅड.प्रवीण चव्हाण हे राज्यात चर्चेत आले होते.

राज्य शासनाने काढले आदेश
राज्याच्या वरीष्ठ अधिकारी वैशाली पी.बोरुडे यांच्या स्वाक्षरीने बुधवार, 21 सप्टेंबर रोजी निघालेल्या आदेशात महाराष्ट्र सरकारने ड.प्रवीण पी. चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडील तब्बल 19 खटले काढून घेण्यात आले आहेत.

महत्त्वपूर्ण खटल्यात मांडली होती बाजू
राज्यातील डीएसके यांचा आर्थिक घोटाळा ,बहुचर्चित समृद्धी जीवन यांनी घोटाळा नागपूर येथील रवींद्र आंबेकर यांच्या संदर्भातील मोका केसेस , राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी केलेला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा घोटाळा, अश्या अनेक महत्त्वाच्या केसेस प्रवीण चव्हाण हे न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडत होते.

पेन ड्राईव्ह बॉम्बने वाढवल्या अडचणी
तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनावेळी मार्च महिन्यात पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून केला होता. फडणवीस यांनी 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनचे फुटेज विधानसभेत सादर करत भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात खोटं कुभांड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्यात अ‍ॅड.चव्हाण यांचा कसा रोल आहे?, हे सांगून खळबळ उडवली होती.

 


कॉपी करू नका.