विरोधकांकडे विकासाचे मुद्देच नाहीत : जळगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

Opposition has no issues of development : Deputy Chief Minister Devendra Fadnavis in Jalgaon जळगाव : विरोधकांकडे विकासाचे मुद्देत नाहीत, भाषणांमधून केवळ शिवराळ भाषेचा वापर होत आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे मुद्दे मांडत आहेत, असे मत जळगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गुरुवारी जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षाताई खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानिमित्त महायुतीच्या सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले होते. त्या सभेत फडणवीस बोलत होते.

ही निवडणूक दिल्लीची
फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी झाली आहे. महायुतीत मात्र नरेंद्र मोदी इंजिन असून, त्यांच्या इंजिनाला मित्र पक्षांच्या बोग्या लागल्या आहेत. त्यात सगळ्यांना बसण्याची जागा मिळते.विरोधकांच्या इंजिनला बोग्या नाहीत. त्यांच्यातील सगळेच म्हणतात मीच इंजिन आहे व इंजिनात केवळ कुटुंबातल्या लोकांना जागा आहे. विरोधक म्हणताहेत, हे संविधान बदलून टाकतील पण या देशाचे संविधान महत्वाचे आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही. ही निवडणूक ग्रामपंचायत किंवा गल्लीतील नसून दिल्लीची आहे. ही निवडणूक विकसित भारताला आर्थिक महासत्ता करणारी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

यांची विचार मंचावर उपस्थिती
सभेला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजप महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे
आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.