संजय राऊत यांच्यावर ठाण्यात उपचाराची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

Sanjay Raut needs treatment in Thane : Guardian Minister Gulabrao Patil जळगाव : संजय राऊत म्हणजे वाया गेलेली केस आहे, आम्ही त्यांच्यापेक्षाही वाईट बोलू शकतो पण आम्हाला बाळासाहेबांनी जे शिकवले, त्यांचे संस्कार आहेत पण आता तुम्ही अंगावर आलाच आहात तर शिंगावर घेवू, असा इशारा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. खासदार राऊत यांची जळगावात जीभ घसरल्यानंतर त्यांनी केलेल्या टिकेला पालकमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिले. गुरुवारी जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षाताई खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानिमित्त महायुतीच्या सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजप महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे
आदींची उपस्थिती होती.

विना मेहनतीने धान्य पिकवणारा माणूस म्हणजे राऊत
आपल्या आक्रमक शैलीत पालकमंत्री पाटील म्हणाले की, पान टपरीवर बसून आमदार होता येत नाही. त्यासाठी आंदोलन केली, अनेक केसेस अंगावर घेतल्या, 24 तास जनतेची सेवा केली. पण तू काय केले? हातात पेन घेऊन सामनात अग्रलेख लिहला आणि दोनदा खासदार झाला. तुम्ही आमच्या मतांवर खासदार झालात, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. विना मेहनतीचे धान्य पिकवणारा माणूस म्हणजे राऊत, असा खोचक टोलाही राऊतांना गुलाबरावांनी लगावला.

राऊतांवर उपचाराची गरज
गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत ही वाया गेलेली केस आहे याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवायला पाहिजे. यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार असल्याने आम्ही खालच्या दर्जाची भाषा वापरणार नाही, असेही ते म्हणाले.


कॉपी करू नका.