13 lakhs online scam to vegetable seller of Jalgaon जळगावच्या भाजीपाला विक्रेत्याला 13 लाखांचा ऑनलाईन गंडा


13 lakhs online scam to vegetable seller of Jalgaon जळगाव : ठोक भावात भाजीपाला देण्याच्या आमिषाने जळगावच्या विक्रेत्याला 13 लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी बुधवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरटीजीएसने घेतले रक्कम
जळगाव शहरातील एमआयडीसी परीसरातील गजानन नगरात संतोष बन्सीला जैसवाल (46) हे भाजीपाला विक्रेते असून जळगाव शहरातील हॉटेल रामा इनच्या मागील बाजूस राहत असलेल्या प्रितेश प्रकाश लोढा याने तो भाजीपाला विक्रीचा मोठा व्यापारी असल्याचे सांगत संतोष बन्सीलाल यांचा विश्वास संपादन केला तसेच ठोक भावात भाजीपाला खरेदी करुन तो चांगल्या भावात विक्री करण्याची बतावणी केली. या कारणासाठी प्रितेश याने वेळावेळी रोख तसेच आरटीजीसएने संतोष जैसवाल यांच्याकडून 14 फेब्रुवारी 2022 ते 11 मार्च 2022 दरम्यान 13 लाख रुपये घेतले.

शहर पोलिसात गुन्हा
अनेकदा मागणी करूनही पैसे प्रितेश लोढा परत करत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर संतोष जैसवाल यांनी याबाबत बुधवार, 21 सप्टेंबर रोजी शहर पोलिसात तक्रार दिल्याने प्रितेश लोढा याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार हे करीत आहेत.


कॉपी करू नका.