जळगावातील ऑटो केअर दुकानातील आगीत चार लाखांचे नुकसान


Fire at Samarth Auto Care in Jalgaon due to short circuit जळगाव : शहरातील समर्थ ऑटो केअर दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगेत तीन लाख 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जळाला. ही घटना शुक्रवार, 30 सप्टेंबर रोजी रात्री 1.30 वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

शॉर्ट सर्किटने लागली आग
मनोज आनंदा गव्हाळे (29, रा.कुसुंबा, जि.जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून त्यांचे जळगाव भुसावळ रोडवर असलेल्या हॉटेल गौरवच्या बाजूला समर्थ ऑटो केअर दुकान आहे. दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, 30 सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास दुकानातील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे 3 लाख 89 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला. महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाच्या बमने ही आग विझवण्यात आली.

एमआयडीसी पोलिसात नोंद
या प्रकरणी मनोज गव्हाळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.