जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या नावाने लाच मागणी : नंदुरबारातील गोदाम किपरविरोधात गुन्हा


Demanding bribe in the name of District Supply Officers: Case against warehouse keeper in Nandurbar नंदुरबार : प्रकरण मिटविण्यासाठ नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या नावाने लाच मागणार्‍या गोदाम किपरविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रकरण मिटविण्यासाठी मागितली लाच
अनरद, ता.शहादा येथील मुळ शेतकरी राजेंद्र भिका पाटील हे पाच वर्षापासून संत मिराबाई महिला बचत गट या नावाने रेशन दुकान चालवित आहेत. 21 डिसेंबर रोजी रेशन दुकानची पाहणी करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार व त्यांच्यासोबत गोडावून किपर दिनेश शामराव रणदिवे हे आले होते.

पाहणी करत असतांना रेशन दुकानाच्या बाहेर बोर्ड लावलेला नाही, रेकॉर्ड व्यवस्थीत ठेवलेले नाही, तुमची धान्य वितरण करण्यासाठी पद्धत बरोबर नाही, धान्य व्यवस्थीत ठेवलेली नाही असे सांगून व्हीजीट बुकात नोंद करत व्हीजीट बुक ताब्यात घेतले. त्यानंतर रणदिवे यांनी पाटील यांना साहेबांचे काय आहे ते करुन टाका, माझे पाच हजार व साहेबांचे 30 हजार रुपये असे 35 हजार रुपये लागतील, असे सांगून 35 हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क करीत तक्रार नोंदवली. न तडजोडीअंती साहेबांच्या नावाचे 25 हजार व स्वतःसाठी चार हजार अशी एकूण 29 हजार रुपये लाचेची मागणी केल्याने रणदिवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी करीत आहेत.


कॉपी करू नका.