दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची : बोर्डाने जाहीर केले वेळापत्रक


This news is important for 10th-12th students: Board has announced the time table मुंबई :  दहावी- बारावीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च आणि दहावीच्या लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहेत.

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार्‍या मुख्य परीक्षेच्या तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. तर 25 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. तर बारावीची परिक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 पासून ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे.

अधिकृत संकेत स्थळावरही मिळेल माहिती
विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी शिक्षण मंडळाने अधिकृत संकेतस्थळेही जाहीर केली आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तारखा विद्यार्थ्यांना कळवण्यात आल्या आहेत याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि बनावट वेबसाईटवर शेअर केलेल्या माहितीच्या मागे लागू नका, असा इशारा बोर्डाने विद्यार्थ्यांना दिला आहे.

 


कॉपी करू नका.