Maratha Reservation मराठा उमेदवारांना मोठा धक्का : सरकारी नोकरीत मिळणार नाही ईडब्लूएसमध्ये आरक्षण


Big shock to Maratha candidates : Reservation in EWS will not be available in government jobs मुंबई : राज्य सरकारने मराठा उमेदवारांना ईडब्लूएसमध्ये आरक्षण देण्याचा निर्णण घेतला होता मात्र हा निर्णय बेकायदा असल्याचे मॅटने म्हटल्याने सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. मराठा उमेदवारांना ईडब्लूएसमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला तसेच काही खात्यांमधील सरकारी नोकर भरतीत मराठा उमेदवारांना आधी मराठा आरक्षण कायद्यांतर्गत आरक्षण देण्यात आले. मात्र, सुप्रीम कोर्टानं हा कायदा रद्द ठरवला. त्यानंतर सरकारनं या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

राज्याचा निर्णय ठरवला बेकायदा
या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी आव्हान दिले होते. त्यावरील सुनावणीत मॅटनं राज्य सरकारचा निर्णय बेकायदा ठरवला आहे. मात्र, त्याचवेळी भविष्यातील सरकारी नोकर भरतींमध्ये मराठा समाजातील पात्र उमेदवारांना ईडब्लूएसचे आरक्षण खुले असायलाच हवे असंही मॅटनं नमूद केले आहे.


कॉपी करू नका.