जळगाव कौटुंबिक न्यायालयातील लाचखोर सहा.अधीक्षकांची जामीनावर सुटका


Bribe of two hundred rupees for the term of alimony: Suspect six. Superintendent released on bail जळगाव : पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षक हेमंत दत्तात्रय बडगुजर (57, इंद्रप्रस्थ नगर, शिवाजी नगर, जळगाव) यांना दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली होती. गुरुवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास जळगावातील न्यू बीजे मार्केटमधील कौटूंंबिक न्यायालयाच्या वरच्या माळ्याजवळील गोविंदा कॅन्टीनजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला होत. संशयीताला शुक्रवारी जळगाव न्यायालयात न्या.खडसे यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता 25 हजारांच्या पी.आर.बॉण्डवर त्यांची सुटका करण्यात आली. तपास पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत.

अवघी दोनशे रुपयांची लाच भोवली
पती-पत्नीत कौटूंबीक वाद असल्याने पुरूष तक्रारदार यांनी पत्नीविरुद्ध कौंटुंबीक न्यायालयात पत्नीने त्यांच्याकडे नांदावयास यावे म्हणून दावा दाखल केला आहे व पत्नीनेदेखील तक्रारदार यांच्याविरुद्ध त्याच कौटुंबीक न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला आहे. या दाव्यात कौटुंबीक न्यायालयाने तक्रारदार यांना 85 हजार रुपये एकरकमी खावटी रक्कम देण्याचा आदेश दिल्याने खावटीची एकरकमी रक्कम जमा करण्याकरीता तारीख वाढवून मिळवून देण्याच्या मोबदल्यात यातील तक्रारदार यांच्याकडे हेमंत बडगुजर यांनी शुक्रवारी 200 रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. बी.जे.मार्केटमधील कौटुंबीक न्यायालयाच्या वरच्या माळ्यावरील गोविंदा कॅन्टीनजवळ पंचासमक्ष लाच स्वीकारताना आरोपीला पकडण्यात आले. नाईक जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.