अर्थसंकल्पात पायाभुत संरचनेचा विचारही नाही

भुसावळातील नाहाटा महाविद्यालयातील कार्यशाळेत तज्ज्ञ मान्यवरांचा सूर


The budget does not even consider infrastructure भुसावळ : केंद्रीय अर्थसंकल्पात काही बदल करण्यात आलेला नाही शिवाय उत्पन्न कराची मर्यादा वाढवलेली नाही,जी मर्यादा वाढवलेली आहे ती भाव वाढीच्या स्वरूपात खिशातून निघून जाईल तर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ठोस असे फारसे निर्णय घेण्यात आलेले नाही. संरक्षण खात्याचा विचार केलेला नाही. शेती, उद्योग, महिला, आरोग्य, पर्यावरण, पायाभूत संरचना या बाबींचा विचार केला गेलेला आहे, असा सुर मान्यवरांनी व्यक्त केला. पु.ओ.नाहाटा महाविद्यालयातील नियोजन अभ्यास मंडळ अर्थशास्त्र विभाग आणि कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने नाहाटा महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पीत कार्यशाळा बुधवारी झाली. यावेळी ही चर्चा झाली.

zयांची कार्यशाळेला उपस्थिती
कार्यशाळेच्या उद्घाटप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील उपस्थित होते. उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.मंगला जंगले उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. वसंत दगडू पाटील, सनदी लेखापाल दीपक मेहराणी उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नीलकंठ भंगाळे डॉ. ए.डी गोस्वामी, नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ.एस.टी.धूम, प्रा. हेमलता कोटेच्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना लाईव्ह अंदाजपत्रक दाखवण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.व्ही.ए.सोळुंके यांनी तर प्रास्ताविक डॉ.एस.टी.धूम तसेच आभार डॉ.किरण वारके यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ.जे.एफ.पाटील, अर्थशास्त्र विभागातील डॉ.ललित तायडे, प्रा.जे.पी.आडोकार, प्रा.शीतल सोनवणे, प्रा.नीता पाटील यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.