राज्यातील संपावर अखेर तोडगा : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सातव्या दिवशी संप मागे


The strike of government employees in the state is finally over : Chief Minister’s assurance मुंबई : सातव्या दिवशी संपावर तोडगा काढण्यास सरकारला यश आले असून संपातील संघटनांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. संपकरी कर्मचार्‍यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदें समवेत चर्चा करीत ती यशस्वी झाल्याचं संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलं आहे. कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीसंदर्भात एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन राज्य सरकारतर्फे संघटनेला देण्यात आले आहे.

सातव्या दिवशी संप मिटला
राज्यात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या 16 लाख कर्मचार्‍यांमध्ये जवळपास साडेतीन ते चार लाख शिक्षकांचा समावेश आहे. आज, सोमवारी संपावर असलेले सर्व शिक्षकांनी राज्यभरातील निरीक्षक कार्यालये, शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने केली. शाळा-महाविद्यालयांसमोर दुपारी 12 ते 12.30 या कालावधीत थाळीनादही करण्यात आला. अखेर, अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधकांनी राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संपाकडे लक्ष वेधले, तसेच शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले असल्यावरही विधिमंडळात आवाज उठवला. त्यामुळे, आज कर्मचार्‍यांचा संप मागे घेतला जाण्याची शक्यता सकाळपासूनच वाटत होती.

मुख्यमंत्री निवेदन सादर करणार
संपातील कर्मचारी व अधिकारी संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर अखेर संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात विधानसभेत निवेदन सादर करणार आहेत. दरम्यान, या घोषणेमुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यास गती मिळणार आहे. तर, गेल्या 6 दिवसांपासून रुग्णालयात होत असलेल्या रुग्णांची गैरसोय दूर होऊन सुरळीत उपचार सुरू होती. त्यासोबतच, शासकीय कार्यालयात नागरीकांना पुन्हा सेवा सुरू होणार असून शाळा, कॉलेजेस आणि विद्यार्थ्याच्या परीक्षांवर होणारा परिणाम टाळण्यास मदत होईल.

 


कॉपी करू नका.