राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सरन्यायाधीशांचे संकेत ! ठाकरे व शिंदे गटाने केला ‘हा’ दावा


मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याबाबत संकेत दिल्यानंतर राजकीय गोटाचे निकालाकडे लागले असतानाच ठाकरे व शिंदे गटाकडून आमच्याच बाजूने निकाल लागणार असल्याचा दावा केला जात आहे. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड समलैंगिक विवाह प्रकरणावर सुनावणी करताना म्हणाले की, गुरुवारी आम्ही घटनापीठाशी संबंधित दोन निकाल देणार आहोत.

काय म्हणाले सरन्यायाधीश ?
ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितले की, समलैंगिक विवाह प्रकरणातील युक्तिवाद दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुरू होऊ शकतो, कारण सकाळी प्रचंड गर्दी असेल. उद्याची सकाळ कामांनी भरलेली आहे. घटनापीठांचे दोन महत्वाचे निकाल द्यायचे आहेत, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सांगितले.

पाच सदस्यीय घटनापीठ निर्णय देणार
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर 14 फेब्रुवारी 2023 पासून नियमित सुनावणी घेण्यात आली. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 16 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. यावर आता सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.स.नरसिंहा यांचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे. अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या घटनापीठातील दुसर्‍या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम.आर.शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत.


कॉपी करू नका.